चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने तरुणीची फसवणूक

पुणे – फेसबुकवर झालेल्या ओळखीतून पुण्यातील एका तरुणीची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणीला चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. तिच्याकडून काही चित्रीकरणही करून घेण्यात आले, यानंतर हे चित्रीकरण परस्पर लघुपट म्हणून प्रदर्शित करण्यात आले. याप्रकरणी एका विरोधात कोंढवा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार अलोकश्री गुप्ता याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुणी आणि गुप्ता यांची फेसबुकवर ओळख झाली होती. त्यानंतर गुप्ताने तरुणीला चित्रपटात अभिनेत्री म्हणून काम करण्याची संधी आहे, असे आमिष दाखविले. त्यासाठी तरुणीला गुप्ताने मुंबईत बोलावून घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एका लघुपटाच्या चित्रीकरण करण्याच्या बहाण्याने तरुणीला वसई भागातील बंगल्यात गुप्ताने नेले. काही चित्रीकरण केल्यानंतर गुप्ताने तरुणीच्या परवानगीशिवाय लघुपट एका संकेतस्थळावर प्रदर्शित केला. तरुणीच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव कुंभार तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)