चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी षडयंत्र : गोविंदा 

बॉलिवूड अभिनेता गोविंदा याचा आगामी “रंगीला राजा’ चित्रपटावर सेंसर बोर्डाने अनेक कटस्‌ मारले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना गोविंदाने आरोप केला की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये असा लोकांचा एक ग्रुप बनला आहे, जो माझा चित्रपट प्रदर्शित होवू नये यासाठी षडयंत्र रचत आहे.

केंद्रीय चित्रपट प्रमाणन बोर्ड (सीबीएफसी)द्वारा चित्रपटातील 20 दृश्‍यांवर अक्षेप घेण्यात आला असून ते वगळण्यास सांगण्यात आले आहेत. त्यानंतर एका संमेलनादरम्यान गोविंदा यांना याबाबत विचारण्यात आले. या चित्रपटाची निर्मिती सीबीएफसीचे माजी प्रमुख आणि चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांनी केले आहे.

गोविंदा म्हणाला, गेल्या नऊ वर्षांपासून असे प्रकार वारंवार घडत आहे. चित्रपटसृष्टीतील काही लोकांचा समूी माझया विरोधात षडयंत्र रचत आहे आणि माझा चित्रपट प्रदर्शित कसा होणार नाही याबाबत प्रयत्नशिल असतो. माझा चित्रपट प्रदर्शित होवू नये, चांगले थिएटर किंवा स्क्रीन मिळू नये, असा त्यांचा प्रयत्न असतो. याचे ताजे उदाहरण “फ्राइडे’ आहे, जो काही आठवडयांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला मीडियातून चांगला प्रतिसाद मिळाला. तरीही चित्रपटगृहातून चित्रपट बाहेर काढण्यात आला, असे गोविंदा म्हणाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)