चित्रपटसृष्टीसह संसदेतही कास्टिंग काऊच…

कॉंग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांचा धक्‍कादायक खुलासा
नवी दिल्ली – बलात्कार आणि कास्टिंग काऊचबाबत प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कॉंग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनीही धक्‍कादायक वक्तव्य केले आहे. कास्टिंग काऊच हे असे वास्तव आहे जे प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळते आणि यापासून संसदही वेगळी नाही, असे त्या म्हणाल्या.

रेणुका चौधरी म्हणाल्या, कास्टिंग काऊच ही समस्या फक्‍त चित्रपटसृष्टीतच आहे, असे नाही. ती प्रत्येक क्षेत्रात असून हेच कटू सत्त आहे. याला राजकारणही अपवाद नाही. त्याचे लोण संसदेपर्यंत पोहचले आहे. सरकारी कार्यालये असोत, लोकसभा असो की राज्यसभा कास्टिंग काऊचचे प्रकार तिथे घडतात. महिला खासदार यातून सुटलेल्या आहेत असे समजू नये.

त्यामुळे आता हा मुद्दा उपस्थित करून, देशाने एकत्र होणे गरजेचे आहे. फक्त आता भारतीय महिलांनी पुढे येऊन याविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. Me too, अर्थात मी सुद्धा पीडित आहे, असे म्हणायला हवे, असे रेणुका चौधरी म्हणाल्या.

दरम्यान, श्री रेड्डी या अभिनेत्रीने टॉपलेस होत दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कास्टिंग काऊचविरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही कास्टिंग काऊचचे प्रकार घडत असल्याचे अभिनेत्रींनी सांगितले. आता राजकारणातही लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरातही कास्टिंग काऊच घडत असल्याचा आरोप रेणुका चौधरी यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावरूनही आता वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)