चित्रपटसृष्टीच्या पितामहांमुळे श्रीलंकन चित्रपटसृष्टी बहरली

पुणे – चित्रपट निर्मितीमध्ये कार्यरत असलेली आमची श्रीलंकेतील ही चौथी पिढी आहे. मात्र बहुसंख्य कलाकारांनी चित्रपटसृष्टीसंबंधीचे शास्त्रोक्त वा तांत्रिक शिक्षण घेतलेले नाही. आमच्या अनेक कलाकृतींवर सत्यजित रे, अकिरा कुरोसावा आणि डॉ. लेस्टर जेम्स पेइरीस या आशियायी चित्रपटसृष्टीच्या पितामहांचा प्रभाव आहे, असे मत श्रीलंकेचे प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते, नाटककार धर्मसिरी बंदरनायके यांनी व्यक्त केले.

पुणे इंटरनॅशनल सेंटर अर्थात पीआयसीच्या वतीने आजपासून येत्या सोमवार दि. 13 ऑगस्टपर्यंत विधी महाविद्यालय रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) येथे श्रीलंकन चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी बंदरनायके बोलत होते.

-Ads-

यावेळी पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या कार्यक्रम समितीचे अध्यक्ष प्रा. अमिताव मलिक, एनएफआयच्या नॅशनल फिल्म हेरीटेज मिशनचे संतोष अजमेरा, महोत्सवाच्या संयोजिका लतिका पाडगावकर, पीआयसीचे मानद संचालक प्रशांत गिरबने आदी उपस्थित होते.

पीआयसीच्या वतीने आयोजित होत असलेला हा सलग अकरावा चित्रपट महोत्सव आहे. महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य आणि खुला आहे. श्रीलंकेतील अंतर्गत युद्धाचे परिणाम विषद करणाऱ्या “विथ यू, विदाऊ ट यू’ या चित्रपटाने चित्रपट महोत्सवाला सुरूवात झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)