‘चित्रकूट’ – प्रेम आणि मैत्रीचा शोध घेणाऱ्या तरुणांची एक विलक्षण गोष्ट 

प्रेम आणि मैत्रीच्या शोधात निघालेल्या तरुणांच्या आयुष्यातील बदलांच्या प्रवासावर भाष्य करणारा चित्रकूटचे चित्रीकरण लवकरच सुरु होणार आहे. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर चित्रीकरणाला सुरवात करण्यात येणार आहे. हिमांशु मलिक या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

चित्रकूट हे एक मध्य प्रदेशातील ठिकाण आहे ज्याचा उल्लेख रामायणात देखील आढळतो. चित्रकूटमध्ये सीतेचे वास्तव्य होते व तिथेच स्थायिक झाली . तिथे सीतेने अत्यंत स्वच्छंदी आयुष्य जगले. याच कारणामुळे प्रसन्न आणि शांततामय असे या ठिकाणाचे लौकिक आहे. चित्रकूटच्या याच गोष्टीचे रूपात्मक वापर करून या गोष्टीला या ठिकाणाचे नाव देण्यात आले आहे. ऑरित्रा घोष, किरण श्रीनिवास, विभोर मयांक, नैना त्रिवेदी आणि श्रुती बापना हे निवेदिता कलाकार या चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण करीत आहेत.

प्रेम संबंधातील भावनिक हिंसा व प्रेमाच्या नंदनवन गाठण्याची प्रेमिकांची इच्छा हा या गोष्टीचा पाया आहे. जागतिक प्रेक्षकांसाठी हा चित्रपट एक मानवी स्वारस्य कथा आहे जिचे वर्गीकरण आशियाई ‘इंडी-आर्ट हाऊस-ग्लोबल’ फिल्म म्हणून करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)