चित्रकलेतून थोर हुतात्म्यांना अभिवादन

राजगुरूनगर- शहीद दिनानिमित्ताने राजगुरुनगर येथील वाडा रस्त्यावर जाणीव परिवार आयोजित चित्रकला स्पर्धेत 350 चित्रकारांनी भाग घेत हुतात्मा भगतसिंग-सुखदेव-राजगुरू यांना अभिवादन केले. शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचे फोटो आणि काही प्रसंग या स्पर्धेत ठेवण्यात आले होते. या स्पर्धेत परिसरातील शाळा, महाविद्यालयतील विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. यावेळी उभारण्यात आलेल्या हुतात्मा राजगुरू जीवनपटाच्या रिकाम्या फ्रेमवर 25 नामांकित चित्रकारांनी थोर हुतात्म्यांची चित्र साकारली. खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर, इतिहास अभ्यासक राजेंद्र सुतार यांच्याश मान्यवरांनी या चित्रकला स्पर्धेला भेट देवून चित्रकारांचे कौतुक केले.

जाणीव परिवाराचे संघटक अमोल वाळूंज म्हणाले की, या स्पर्धेत काढण्यात आलेली शहिदांचे फोटो, प्रसंग यांचे 24 ऑगस्ट 2019 रोजी प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यादिवशी या स्पर्धकांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. स्पर्धेसाठी अमोल वाळूंज, अजिंक्‍य बकरे, अतिक सय्यद, संदिश शिंदेकर, सौरभ लुणावत, शलेंद्र बकरे, श्रेयस अहिरे, रोहित बेलसरे, अभी घुमटकर, ओंकार कहाणे रोहित मुळूक, निखील सातकर यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)