चित्रकलेची आवड असणाऱ्यांसाठी कपूर महाविद्यालयात कार्यशाळा

लोणी काळभोर -चित्रकलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावी – बारावीनंतरच्या विविध अभ्यासक्रमांची ओळख व्हावी म्हणून येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने एक कार्यशाळा आयोजित केल्याची माहिती प्राचार्य एस. एम. गवळी यांनी दिली.
मंगळवारी (दि. 29) सकाळी साडे नऊ वाजता ही कार्यशाळा लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये होणार आहे. मुंबईतील मंथन स्कूल ऑफ क्रिएटिव्ह ऍडव्हर्टायझिंग ऍन्ड आर्ट या संस्थेचे संस्थापक शशिकांत गवळी या कार्यशाळेत सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. आजचे जग हे जाहिरातींचे आहे. जाहिरातीमधील चित्र व शब्द यांचा सुरेख संगम झाल्यास संबंधित उत्पादनाच्या विक्रीत प्रचंड प्रमाणात वाढ होते. त्यामुळे अशा जाहिराती बनवणाऱ्या तरुण पिढीला या क्षेत्रात प्रचंड वाव आहे. परंतु या संदर्भातील शिक्षण देणाऱ्या संस्थांमधील अभ्यासक्रम खुपच जुने आहेत. त्यामुळे चित्रकलेची आवड असणाऱ्या नवीन पिढीतील प्रतिभासंपन्न युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)