“चित्रकर्मी पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन

पुणे, – अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या सुवर्ण महोत्सव प्रसंगी नेत्रदिपक चित्रपट सोहळा यंदा पुण्यात पार पडणार आहे. तो म्हणजे ‘चित्रकर्मी पुरस्कार -2017’ सोहळा. या सोहळ्यात यावेळी चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कलाकार व तंत्रज्ञांना हा पुरस्कार देवून त्यांनी दिलेल्या चित्रपटसृष्टीच्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करून गौरविण्यात येईल. यावेळी झगमगती विद्युत रोषणाई आणि नृत्याविष्काराने हाचित्रकर्मी पुरस्कार 2017 हा सोहळा यंदा पुण्यातील बालगंधर्व रगमंदिर येथे 24 जुलै रोजी सायं 5 वाजता पार पडेल. या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सिनेमा क्षेत्रात अखंड वाहून घेतलेल्या रंगकर्मींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. यावेळी चित्रपट क्षेत्रातील सर्व मान्यवर या कार्यक्रमाला हजेरी लावतील. या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये बहारदार नृत्याविष्कार, नाटकाचे स्किट्‌स आणि विनोदी ढंगात सादर केलेले सूत्रसंचाल उपस्थित रसिकांनी मनमुराद पणे अनुभवता येईल. अशी माहिती आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, निकिता मोघे, संजय ठुबे, शार्दुल लिहणे, गिरीश कोळपकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)