चिठ्ठी देण्यास नकार दिल्याने मुलाला मारहाण

पिंपरी – तरुणीला चिठ्ठी देण्यास नकार देणाऱ्या 13 वर्षाच्या मुलाला तरुणाने बेदम मारहाण केली आहे. यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला. हा प्रकार रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आळंदी येथे घडला.

नवनीतकुमार नानासाहेब देशमुख (वय-35, रा. हरिओम आश्रम, इंद्रायणी नगर, देवाची आळंदी) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात मोटार सायकल स्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश राम गजलवाड असे जखमी मुलाचे नाव आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुख आळंदी येथील हरिओम आश्रमात शिक्षक म्हणून नोकरीस आहेत. ते मुलांना योगा शिकवितात. त्यांच्या आश्रमातील गणेश गजलवाड आणि गोकुळ जाधव (वय-15) हे दोघेजण इंद्रायणी नदीच्या काठावर बसले होते. त्यांच्या शेजारी काही अंतरावर 4-5 तरुणी बसल्या होत्या. दरम्यान आरोपीला त्या मुलींपैकी एका मुलीला चिठ्ठी द्यायची होती. त्यासाठी त्याने गणेशची मध्यस्थ म्हणून निवड केली.

आरोपी तरुणाने गणेश जवळ चिठ्ठी दिली. ही चिठ्ठी त्यांच्या पलिकडे बसलेल्या तरुणींपैकी एका तरुणीला दे असे सांगितले. याला गणेश याने नकार दिला. यावरून रागावलेल्या तरुणाने गणेशला शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेनंतर गणेश आणि गोकुळ इंद्रायणी घाटावरून आश्रमाकडे पायी चालत परत येत होते. त्यावेळी आरोपीने त्याची दुचाकी (एमएच 12 / सीव्ही 3399) गणेशच्या अंगावर घातली. यामध्ये गणेशला गंभीर दुखापत झाली. यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन लगेच धूम ठोकली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)