पिंपरी – जादा पैशांचे आमिष दाखवून एका सभासदाची तब्बल 8 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कंपनीचे अध्यक्ष, संचालक यांच्यासह सहा जणांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामचंद्र बाळु चांदारे (वय-46, रा. जनवाडी, पुणे) असे फसवणूक झालेल्या इसमाचे नाव आहे. ओमिशा चिट फंड कंपनीचे अध्यक्ष योगेश भोसले (वय-30, रा. विटा, खानापूर, सांगली), संचालक मानसिंग शंकर घोरपडे (वय-40, रा. ऐश्वर्यम सोसायटी, चिंचवड, मु. रा. विटा, सांगली), कैलास परब (वय-55, रा. कुमार प्रेसिडेन्सी, कोरेगाव पार्क), सुशीलकुमार सुमतीलाल संघवी (वय-43, रा. संघवी निवास, निगडी), विकास मुक्ताजी नाणेकर (वय-45, धृव अपार्टमेंट, प्राधिकरण, निगडी), दत्तात्रय महादेव टकले (वय-59, रा. सेक्‍टर 26, आदित्य बंगला, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2012 ते 2015 दरम्यान रामचंद्र चांदारे यांना पिंपरीतील ओमिशा चिट फंड कंपनीचे संचालक मंडळ आणि अध्यक्ष यांनी जादा पैशांचे आमिष दाखवून हप्त्याने-हप्त्याने तब्बल 7 लाख पाच हजार रुपये भरण्यास सांगितले. मात्र बरेच वर्ष उलटून देखील चांदारे यांना अद्याप लाभासह 8 लाख 25 हजार रुपये परत देण्यात आले नाही. अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पिंपरी पोलिसांनी या सर्वांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)