चिखली शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

कुरवली- चिखली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत कार्यालयात माजी सैनिक बबन संभाजी उंबरे व दगडू जगन्नथ अर्जुन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी लेझिम पथक, भाषणे व कवायत करू उपस्थितांची मने जिंकली. यावेळी वर्षा हिचे मुबंई पोलीस दलात निवड झाल्याबदल ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. त्‌ दरम्यान, शासनाच्या 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतीकडून शाळेसाठी 42 इंची एलडी टीव्ही देण्यात आला. देखभाल दुरूस्ती अंतर्गत प्राथमिक शाळेची तसेच अंगणवाडीची सर्व फरशी बसवण्यात आली व शाळेला रंगरंगोटी करण्यात आली असून अंगणवाडीला वजन काटा देण्यात आला आहे. तर विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी खेळाचे साहित्य देण्यात आले. याप्रसंगी गावच्या सरपंच सुवर्णा भंडलकर, उपसरपंच शोभा गायकवाड, ग्रामसेवक एस. आर. लोणकर, पोलीस पाटील राजू गायकवाड, शाळा व्यस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मण पवार, शाळेच्या मुख्याध्यापिका रुपाली भोसले, शिक्षक संजय भुसे, दिपा राठोड, अंगणवाडी सेविका छाया कदम, तायाप्प्पा पवार, महादेव कवळे, गिरीधर खोमणे, दादा वणवे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)