पिंपरी – चिखली, मोशी या परिसरातील अनेक सोसाट्यांना महापालिका प्रशासनाकडून पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे त्या सोसाट्यांना आजही टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. याकडे पाणी पुरवठा विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नवीन घरात रहायला जावून पाणी मिळत नसल्याने त्यांच्या आनंदावर विरजन पडले आहे.
अनेक नागरिकांना कर्ज काढून घरे विकत घेतली आहेत. शहरात स्वतःचे हक्काचे घर असावे म्हणून त्यांनी खटाटोप केला. त्यांनी महापालिका हद्दीतील सामाविष्ट गावात घर घेवून ते आनंदात राहायला आले. परंतु, त्या परिसरात पाणी टंचाई होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन लागत आहे.
महापालिकेला हजारो रुपये पाणीपट्टी भरुनही पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे स्थानिक शेतकरी व जागा मालकांकडून बोअरवेलचे किंवा टॅंकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. याकडे स्थानिक नगरसेवकही दुर्लक्ष करीत आहेत. चिखली-मोशी परिसरात अनेक गृहनिर्माण प्रकल्प साकारले आहेत. त्या सोसायट्यांना महापालिकेने जलवाहिन्या टाकल्या आहेत. नळजोड दिलेले आहेत. मात्र पुरेसे पाणी मिळत नसल्याने सोसायट्यांना टॅकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे, अशी माहिती स्थानिक नागरिक किशोर जाधव यांनी दिली आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा