चिखलीत शेळीची 40 पिल्ले दगावली

अज्ञात आजाराने शेतीपुरक व्यवसायात शेतकऱ्यांना फटका

कुरवली- चिखली (ता. इंदापूर) येथील शेळीची 40 पिल्ले अचानक दगावल्याने नागरिक धास्तावले आहेत. यामध्ये पिल्लाच्या जन्मानंतर लहान पिल्लांनी अचानक दूध पिणे सोडून दिल्याने व मागील दोन आठवड्यात दगावलेल्या पिल्लांची संख्या जास्त असल्याने सर्वसामान्य नागरिकानी चिंता व्यक्त केली आहे.
ग्रामीण भागातील नागरिक मजुरी करीत शेळीपालनाचा जोडधंदा करतात. मात्र, अचानक अशी आर्थिक झळ बसल्यानंतर कोणाकडे दाद मागायची, असा सवाल करताना वृद्ध वामन कवळे यांच्या डोळ्यात पाणी आले. गावातील 13 नागरिकांच्या शेळीची पिल्ले दोन आठवड्यात दगावली असल्याने उपचाराअभावी गावातील अजून पिल्ले मरण्याची भिती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
गावातील मजूर शेळीपालक शिवाजी रिटे यांची 10 पिल्ले, वामन कवळे यांची 8 पिल्ले, नारायण खोमणे यांचे 6 पिल्ले यासह अन्य काही जणांची पिल्ले दगावली आहेत. याबाबत शिवाजी रिटे यांनी सांगितले की, पिलांनी अचानक दूध पिणे सोडून दिले तर एक पाय लंगडत दोन तासात हालचाल बंद केली त्यानंतर काही क्षणात मृत्यू झाला. अन्य पिलांवर अद्यापही योग्य उपचार झालेले नाहीत यामुळे पिल्ले दगावण्याची भीती आहे. गावातील सर्वसामान्य मजूर कुटुंबातील पिल्ले दगावली असल्याने यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तातडीने वेळीच योग्य उपचार करण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

  • शेळी मालक व गावातील आजारी शेळ्यांची तपासणी करण्यात आली आहे. दगावलेल्या पिलाची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर नेमके कारण सांगता येईल. गावातील बाधित पिल्लांना प्रतिबंधात्मक पी.पी.आर.लस दोन दिवसांत देण्यात येईल.
    – डॉ. पी. एम. तरंगे, पशुधन विकास अधिकारी
-Ads-

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)