चिखलीत विवाहितेची आत्महत्या

पिंपरी – माहेराहून पैसे आणण्यासाठी शारिरीक आणि मानसिक छळ केल्याने विवाहितेने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. चिखलीतील सोनवणे वस्ती येथे ही घटना घडली.

दिपाली प्रदीप अहिरे (वय-27) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी विवाहितेचे भाऊ संदीप जाधव (वय-31, रा. म्हात्रे वस्ती, पश्‍चिम ठाणे, जि. ठाणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरून तिचा पती प्रदीप बळीराम अहिरे (रा. शाईन सिटी, सी/605, सोनवणे वस्ती, चिखली), सासरा बळीराम अहिरे, सासू लताबाई अहिरे, नणंद मनिषा बोरसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती प्रदीप आणि सासरची मंडळी सतत दिपालीच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला टोचून बोलत असत. त्याचप्रमाणे माहेराहून पैसे आणण्यासाठी तिचा छळ करत असत. त्यामुळे अखेर तिने मृत्यूला कवटाळले. पोलीस उपनिरीक्षक आर. एम. भोये तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)