चिखलीत राष्ट्रीय महापौर भारत श्री स्पर्धा

पिंपरी – महापौर भारतश्री-2018 राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे शुक्रवार दि. 23 व शनिवार दि. 24 मार्चला आयोजन केले आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांच्या नावाने राष्ट्रीय स्पर्धेचे उद्‌घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते शनिवार दि. 24 ला सायंकाळी पाच वाजता चिखली, जाधववाडी येथील रामायण मैदानावर होणार आहे.

भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, ऍड. गौतम चाबुकस्वार, खासदार अमर साबळे, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, सुप्रिया सुळे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, क्रीडा समिती सभापती लक्ष्मण सस्ते, महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर उद्‌घाटनास उपस्थित राहतील, अशीही माहिती महापौर काळजे यांनी दिली.

स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन बॉडी बिल्डिंग ऍण्ड फिटनेस फेडरेशन यांच्या मान्यतेने पिंपरी-चिंचवड महापालिका क्रीडा विभाग, महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या व पिंपरी-चिंचवड ऍमेच्युअर बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. स्पर्धेत देशातील 29 राज्यांमधून प्रथमच 45 महिलांसह 535 स्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांना 16 लाख 65 हजारांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. शहरात प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील बॉडी बिल्डिंग स्पर्धा होत आहे.

यावेळी महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे खजिनदार राजेश सावंत, नगरसेवक राहुल जाधव, अश्विनी जाधव, वसंत बोराटे, नितीन बोऱ्हाडे, उद्योजक कार्तीक लांडगे, सुभाष जाधव, संतोष जाधव, सागर हिंगणे उपस्थित होते.

महिलांच्या स्पर्धा
विजेत्यांना रोख बक्षिसांसह स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. पुरूषांच्या एकुण 11 गटात (55 किलो ते 100 किलो व खुला वजन गट), महिलांच्या खुला गट व बिकीनी फिटनेस गटात स्पर्धा होतील. महापौर भारत श्री-2018 स्पर्धेतील खेळाडुंना चॅम्पियन ऑफ चॅम्पियन 3 लाख रुपये, ओव्हर ऑल चॅम्पियन 50 हजार रुपये, बेस्ट पोजर, मोस्ट इम्प्रुव्हर बॉडी बिल्डर, टीम चॅम्पियनशीप प्रत्येकी 10 हजार आणि महिला गटातील विजेत्यांना एकुण 1 लाख 14 हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे, असे फेडरेशनचे सचिव संजय मोरे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)