चिखलीत रविवारी मोफत सामुदायिक विवाह सोहळा

पिंपरी – नगरसेवक राहुलदादा जाधव स्पोर्टस्‌ फाउंडेशनतर्फे नगरसेवक राहुल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि. 25) चिखली येथे सर्वजातीधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यामध्ये सोळा जोडपी विधीवत विवाहबद्ध होणार आहेत.

जाधववाडीतील रामायण मैदानावर हा विवाह सोहळा होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री गिरीश बापट, भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे तसेच नारायणपूर येथील नारायण अण्णा महाराज आदी उपस्थित राहणार आहेत.

साखरपुडा, हळदी, आणि लग्न असे या सोहळ्याचे स्वरुप आहे. लग्न झालेल्या जोडप्यांना नवीन संसाराला हातभार म्हणून आयोजकांतर्फे संसारोपयोगी वस्तू देण्यात येणार आहेत. अनेक ठिकाणच्या सोहळ्यात छुप्या पद्धतीने शुल्क आकारले जाते. तसेच केवळ विवाह लावून दिले जातात. मात्र, गरीबीमुळे विशेषत: मुलींना विवाहात हौसमौज करता येत नाही. याचमुळे साखरपुडा, हळद असे सर्व विधी उत्साहापूर्ण वातावरणात करण्याचा निर्णय घेतल्याचीही माहिती आयोजकांनी दिली.

महापौरपदासाठी शक्‍तीप्रदर्शन
स्थायी समिती पाठोपाठ महापौर बदलाची जोरदार चर्चा सत्ताधारी भाजपमध्ये आहे. आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक तसेच दुसरी टर्म असल्याने राहुल जाधव या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जातात. स्थायी समितीचे अध्यक्षपद चिंचवड विधानसभा मतदार संघात गेल्याने महापौरपदावर भोसरीची दावेदारी मानली जात आहे. अशातच वाढदिवसाचे औचित्य साधत तसेच मुख्यमंत्री फडणवीस तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना सामुदायिक विवाह सोहळ्याला बोलवून राहुल जाधव यांनी शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी केल्याची चर्चा चिखलीच्या पंचक्रोशीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)