चिखलीत महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

file photo

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने 22 ते 25 नोव्हेंबरदरम्यान माजी महापौर कै. मधुकर पवळे महापौर चषक राज्यस्तर कबड्डी स्पर्धा आयोजित केली आहे.

चिखली, पूर्णानगरमधील जुन्या आरटीओ कार्यालयामागील शनि मंदिराजवळील मैदानावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. गुरुवारी (दि.22) सायंकाळी सहा वाजता या स्पर्धेचे उद्‌घाटन होणार आहे, तर पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते रविवारी (दि.25) रात्री आठ वाजता विजेते संघ व खेळाडूंना पारितोषिक वितरण केले जाणार आहे, अशी माहिती सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी क्रीडा समिती सभापती संजय नेवाळे, शैलेश मोरे, सुजाता पालांडे, अपर्णा डोके, अनुराधा गोफणे, कबड्डी असोसिएशनचे शेखर रावडे, कविता आल्हाट आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत राज्यभरातून 30 पुरूष आणि 20 महिला संघातील एकूण 700 खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील दोन्ही गटातील संघांना समान रोख पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास पावणे दोन ला रुपये, द्वितीय क्रमांकाला एक लाख रुपये, तृतीय व चतुर्थ क्रमांकाच्या विजेत्यास प्रत्येकी 55 हजार 555 रुपये रोख रक्कम व चषक दिला जाणार आहे.

याशिवाय दोन्ही गटात प्रत्येक दिवशी दिवसाचा मानकरी ठरलेल्या खेळाडूस पाच हजार रुपये, तर उत्कृष्ट चढाई, पकड व अष्टपैलू खेळाडूस साडे सात हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. या स्पर्धेत सांघिक आणि वैयक्तिक गटात एकूण 8 लाख,57 हजार 220 रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत.

या स्पर्धेत पुरुष गटात गणेश कांबळे, नितीन मदने, प्रशांत चव्हाण, निलेश शिंदे, अजिंक्‍य कापरे, चेतन थोरात, कुणाल यादव, रोहित पार्टे हे नामंकीत खेळाडू सहभागी होणार आहेत. तर महिला गटात सायली केरीपाळे, स्नेहल शिंदे, पूजा शेलार, सोनाली शिंगटे, लता पांचाळ, शिवनेरी चिंचवले, दीपिका जोसेफ, अंकीता जगताप, आम्रपाली गलांडे, ललिता घरत या नामांकित खेळाडूंचा सहभाग असणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)