चिखलीत मजुराचा खून

चिखली – शेलारवस्तीमध्ये डोक्‍यात दगड घालून एका मजुराचा खून करण्यात आला. शेलारवस्ती मधील दगडखाणी जवळ शुक्रवारी (दि.11) सायंकाळी एक मृतदेह आढळला होता. पोलिसांनी तपास केला असता हा खून असल्याचे उघड झाले आहे.

विजय प्रल्हाद सोळंकी (वय-40, रा. भांगरे कॉलनी, चिखली) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय हे मुळचे वाशीम येथील असून सध्या चिखलीत राहत होते. ते बांधकाम साईटवर मोलमजुरीचे काम करत होते.

शुक्रवारी सकाळी ते घरातून बाहेर गेले होते. मात्र परत आले नव्हते. सायंकाळी पाचच्या सुमारास दगडखाणी जवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)