चिखलीत प्लास्टिक कचऱ्याला आग

चिखली – मोकळ्या जागेत टाकलेल्या प्लास्टिक कच-याला आग लागली. ही घटना आज शुक्रवारी (दि. 20) दुपारी बाराच्या सुमारास चिखली येथे घडली. कचरा पेटण्याची नेमके कारण अद्याप समजले नाही.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली कुदळवाडी मधील भैरवनाथ मंदिराजवळ मोकळ्या जागेत नाल्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला आहे. त्यामध्ये प्लास्टिक आणि भंगार वस्तूंचा समावेश आहे. आज दुपारी बाराच्या सुमारास अचानक कचरा पेटला. अग्निशमन विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. तळवडे, वल्लभनगर, भोसरी आणि प्राधिकरण अग्निशमन विभागाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र, पेटलेल्या कच-यातून धूर धुमसत आहे. धुराचे लोट मोठ्या प्रमाणात हवेत मिसळत असल्याने हा कचरा पुन्हा पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

-Ads-

या घटनेत कोणतेही आर्थिक नुकसान झाले नाही. मात्र कचरा पेटण्याची घटना वारंवार घडत असल्याने हवा प्रदूषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कचरा पेटतो की पेटवून दिला जातो, असा देखील प्रश्न नागरिकांमधून विचारण्यात येत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)