चिखलीतील महापालिका शाळेचे काम अंतिम टप्प्यात

पिंपरी – चिखली या ठिकाणी सोयी-सुविधायुक्त महापालिका शाळेच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. चार मजली इमारतीमध्ये लिफ्टसह अत्याधुनिक सुविधा विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. सद्यस्थितीत शाळेच्या इमारतीचे अंतर्गत काम पूर्ण झाले असून बाहेरील संरक्षण भिंत बांधण्यात येत आहे. यामुळे, विद्यार्थी जुन्या शाळेतून लवकरच नवीन इमारतीत दाखल होणार असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे.

चिखली हा परिसर मोठा असल्याने या ठिकाणी महापालिका शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या ठिकाणी बालवाडी ते सातवी पर्यत शाळा असून सुमारे दीड हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या हे विद्यार्थी जुन्या शाळेत शिकत असून त्या ठिकाणी अनेक अडथळ्यांची शर्यत मुख्याध्यापक व शिक्षकांना पार करावी लागत आहेत. या अडचणीतूनही मार्ग काढत शाळेने अनेकदा नावलौकीक मिळविला आहे. शाळेच्या जुन्या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यास पुरेशी जागा नव्हती. दोन सत्रात शाळा घेऊनही वर्ग खोल्यांच्या अभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. मुलांना शाळेसमोरील मैदानात किंवा व्हरांड्यात बसून शिकवावे लागत असे. इमारतीला लागूनच असलेल्या पत्र्याच्या खाली दोन वर्ग एकत्र करुन बसविले जात होते. सध्याची जुनी शाळाही मोठी आहे. परंतु, शाळेची दुरवस्था झालेली आहे.

एक एकर परिसरात ही शाळा उभारण्यात आली आहे. या शाळेत 41 वर्गखोल्या असून चार स्टाफरुमसह विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळण्यासाठी दोन प्रशस्त हॉल बांधण्यात आले आहे. तसेच, सुसज्ज दोन कॉम्प्युटर लॅब, एक अभ्यासिका, प्रत्येक मजल्यावर मुला-मुलींसाठी स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत. शाळेच्या तळमजल्यावर पार्किंगसाठी राखीव जागा ठेवण्यात आली आहे. चार मजली इमारत असल्याने अत्याधुनिक लिफ्टची सुविधा देण्यात येणार आहे. या संपूर्ण शाळेच्या बांधकामासाठी महापालिकेने साडेसात कोटी रुपये खर्च केले आहेत.

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. यामुळे शहरातील अनेक शाळांमध्ये पटसंख्या वाढत आहे. चिखली या ठिकाणी महापालिका शालेची सुसज्ज इमारत बांधली असल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर होणार आहेत.
– ज्योत्स्ना शिंदे, शिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)