चिक्कु, कलिंगड, खरबूज, पपईच्या भावात वाढ

पुणे – रमजानचे उपवास सुरू असल्यामुळे मार्केट यार्डातील फळ विभागातील सर्व फळांना मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने चिक्कू, कलिंगड, खरबूज आणि पपईच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत सुमारे 5 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळांचे भाव स्थिर आहेत.
रविवारी येथील फळबाजारात अननसची 6 ट्रक, मोसंबीची 21 टन, संत्रीची 1 टन, डाळिंबाची 30 ते 35 टन, पपईची 10 ते 15 टेम्पो, लिंबाची 4 ते 5 हजार गोणी, चिक्कू एक हजार डाग, पेरु 100 क्रेटस्‌, कलिंगड 20 ते 25 टेम्पो, खरबुजाची 15 ते 20 टेम्पा आवक झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : 100-300, अननस (डझन) : 70-270, मोसंबी : मद्रास: (3 डझन) : 260-450, (4 डझन ) : 150-250, संत्रा : ( 3 डझन) 300-500, (4 डझन) : 180, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : 20-100, गणेश 10-30, आरक्ता 10-40. कलिंगड : 5-15, खरबुज : 10-20, पपई : 5-25, चिक्कू : 100-700, पेरू (20


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)