चिकणे कुटुंबियांना संजय गांधी अर्थसहाय्य योजनेतून मदत

कुसुंबी ः चिकणे कुटुंबियांन मदतीचा धनादेश प्रदान करताना सचिन जवळ, सौ. रोहिणी आखाडे, सतीश बुद्धे व कमिटीचे सदस्य.

कुसुंबी, दि. 23 (वार्ताहर) – एखाद्या कुटुंबातील कर्ता, कमवता पुरुष अचानक अल्पशा आजाराने गेल्यावर पाठीमागे असणाऱ्या पत्नी, मुलांचा आधार तुटतो. प्रसंगी त्या कुटुंबाची वाताहत होत असते. अशा कुटुंबाला आधार आणि मदतीची गरज असते. त्यांना धीर देणे, मदतीचा आधार देणारे समाजातील कोणीच पुढे येत नाही, त्यावेळी असे कुटुंब खचून जाते. कै.जयसिंगराव चिकणे यांचे गेल्या 4 महिन्यांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. जयसिंगराव हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहत असत. संजय गांधी निराधार कुटुंब अर्थसहाय्य या कमिटीचे अध्यक्ष असताना त्यांनी अनेक कुटुंबाना मदतीचा हात दिला होता. जयसिंगराव हे कुटुंबातील एकमेव कर्ते पुरुष गेल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. जयसिंगराव चिकणे यांच्या मागे पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे.
या कुटुंबात शेती अथवा इतर कोणतेच उत्पन्नाचे साधन नसल्याने या कुटुंबाची वाताहत सुरू झाली. या कुटुंबाला आपल्या मुलांचे शिक्षण आणि इतर खर्चासाठी या कुटुंबाला मदतीची गरज असल्याचे ओळखून आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना व कुटुंब अर्थसहाय योजनेतर्गंत कै. जयसिंगराव चिकणे यांच्या पत्नी श्रीमती मनिषा चिकणे व चिरंजीव निखिल चिकणे यांना अर्थसहाय्य योजनेतून धनादेश प्रदान करण्यात आला. या प्रसंगी कमिटीचे अध्यक्ष सचिन जवळ, तहसिलदार सौ. रोहिणी आखाडे, गटविकास अधिकारी सतीश बुध्दे व कमिटी सदस्य उपस्थित होते.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)