चिकणी खामगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात

संग्रहित छायाचित्र

गोपाळपूर – नेवासा तालुक्‍यातील चिकणी खामगाव येथे सोमवारपासून 44 व्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रथंराज ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्यास ध्वजारोहन करून प्रारंभ झाला.सकाळी 9 वाजता दधनेश्‍वर देवस्थानचे प्रमुख अशोक महाराज बोरूडे यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले.

दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही मोठ्या उत्साहात गावातील सर्व जाती-धर्मातील लोक एकत्र येऊन सप्ताहात मोठ्या भक्ती भावाने सहभागी झाले आहेत. दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये काकडा, ज्ञानेश्‍वरी पारायण, रामायण कथा, दररोज महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकारांच्या कीर्तनांचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचे नियोजनात गावातील तरूण, वयोवृध्द, महाराज मंडळी, माताभगिनी मोठ्या भक्‍तीभावाने सहभागी होतात.

यावेळी राजेंद्र महाराज आसने, नवनाथ महाराज आगळे, रामकिसन महाराज काळे, कृष्णा महाराज जगदाळे, संभाजी महाराज आगळे, संपतराव काळे, दादाराम आघाम, कडूबाळ काळे, बाळासाहेब आगळे, बाबासाहेब काळे, भगवान भवर, शिक्षक जयप्रकाश राशिनकर, अश्‍विनी बावरकर, अरूण रासने, शिवाजी पांढरे, निवृत्ती आगळे, किसन घुले, प्रमोद शिंदे, माजी सरपंच अशोक आगळे, शिवाजी साबळे, कारभारी रासकर, पांडुरंग भुमकर, बबन आगळे, अमोल आगळे, आदींसह पसायदान कमीटी, ग्रामस्थ व भजनी मंडळ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)