चिंबळी- संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून चिंबळी (ता. खेड) येथील इंद्रायणी नदीकाठी असलेल्या स्माशानभूमतीत बांधण्यात आलेल्या प्रवचन ओट्याचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले.चिंबळी येथील जुन्या पिढीतील प्रगतीशिल शेतकरी व दूध व्यवसायिक तसेच खेड तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य बबनराव राघूजी कड व भैरवनाथ गणेश मित्र मंडळाचे युवा कार्यकर्ते संदिप मुरलीधर कड यांच्या स्मणार्थ या ओट्याची निर्मिती करण्यात आले. एक सामाजिक कार्य म्हणून मुरलीधर कड, दत्तात्रय कड, बाळासाहेब कड, भानुदास कड, रोहिदास कड, शांतीलाल क डयांनी हा उपक्रम राबविला. वतीने लोकार्पण करण्यात आला. तसेच दिंडी सोहळ्यासाठी व गावातील विविध मंदिरांच्या विकासकामासाठी देणगी देण्यात आली, असल्याचे तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष भानुदास कड यांनी सांगतिले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा