चिंबळी बंधाऱ्यावर जलपर्णी खुजल्याने दुर्गंधीचे साम्राज्य

चिंबळी- खेड तालुक्‍याच्या दक्षिण भागातील मोशी चिंबळी हद्दीत असलेल्या इंद्रायणी नदीवर राज्य सरकारने बांधलेल्या केटी बंधाऱ्यात जलपर्णी अडल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.
गेल्या वर्षी जून महिन्यात झालेल्या पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्यात वाढ झाली होती. जानेवारी महिन्यापासून इंद्रायणी नदीच्या पाण्यात जलपर्णीची वाढ होते. त्यानंतर जून-जुलै महिन्यात पाऊस सुरू झाला की इंद्रायणी नदीच्या पाण्यात वाढ होउन जलपर्णी वाहून जाते. पंरतु, या वर्षी जून-जुलै महिन्यात पाऊस कमी प्रमाणात झाल्याने इंद्रायणी नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली नाही. त्यामुळे जलपर्णी वाहुन न जाता बधांऱ्यात अडकली आहे. नदीच्या पाण्याची पातळी खोलवर गेल्याने जलपर्णी बंधाऱ्यात अडकून खुजल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे लवकरात लवकर जलपर्णी काढण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)