चिंबळी फाटा “श्रीसमर्थ’मध्ये शिक्षकदिन साजरा

चिंबळी- आई-वडील जसे आपल्यावर प्रेम करतात तसेच शिक्षकही विद्यार्थ्याना ज्ञानाचे धडे देऊन भावी पिढी घडविण्याचे काम करीत असल्याने शिक्षकांचा आदर ठेवला पाहिजे, असे प्रतिपादन श्रीसर्मथ इंग्लिश मीडियम स्कुल आणि कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गवारे यांनी केले. चिंबळीफाटा (ता. खेड) येथील श्री सर्मथ इंग्लिश मीडियम स्कुल आणि कॉलेजच्या वतीने शिक्षक दिन आणि सर्वपल्ली राधाकृष्ण जयंती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गवारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले, त्यावेळी ते बोलता होते. शिक्षक दिनानिमित्त श्रीसर्मथ इंग्लिश मीडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव प्राचार्य शिक्षकेतर कर्मचारी अशा भूमिका सादर करून शाळेचा सर्व कारभार सांभाळत शिक्षकांना येणाऱ्या अडचणी विद्यार्थ्यांनी मनोगतात मांडून सर्व शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्या अनिता टिळेकर यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवनप्रवास सांगून सर्व विद्यार्थ्याचे कौतुक आणि अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने कविता गाडेकर, स्मिता नलगे, सोनिका काबंळे, रूपाली सपकाळ, प्रेरणा गोंगे, शितल पाटील यांनी केले होते. त्याचप्रमाणे चिंबळी तेथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने शिक्षक दिन पंचायत समितीचे सदस्य अमर कांबळे यांच्या उपस्थितीत सर्वपल्ली राधाकृष्णन आणि सरस्वती प्रतिमेचे पुजन करून सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष आणि आजी-माजी संचालक शिक्षक उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)