चिंबळी फाटा येथे पायी पालखी सोहळ्याचे स्वागत

चिंबळी – किल्ले शिवनेरी ते किल्ले पुरंदर छत्रपती शिवाजीराजे-छत्रपती संभाजीराजे भेट पायी पालखी सोहळ्याचे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चिंबळी फाटा येथे ग्रामस्थांनी स्वागत केले. यावेळी खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोर, चिंबळी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच हेमंत जैद, अरूण जैद , नितीन जैद, प्रशांत जैद, हिरामण जैद, राजेंद्र जैद, सुनील बटवाल, आकाश जैद, दत्तात्रय जैद, वासुदेव जैद आदि मान्यवर उपस्थित होते. शिवचरित्र व शंभुचरित्र कथाकार हभप बाजीराव महाराज बांगर यांच्या नेतृत्वाखाली स्वराज संघाच्या वतीने पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या सोहळ्यातील भाविकांना चिंबळी फाटा येथे चहा-नाष्टाची सोय करण्यात आली होती. त्यानंतर चिंबळी फाटा मार्गे चिंबळीगाव ते केळगाव मार्गे आळंदीकडे मार्गस्थ झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)