चिंबळी परिसरात सोयाबीन पिकाची काढणी

चिबंळी- खेड तालुक्‍यातील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या चिंबळी, कुरूळी, निघोजे मोई, केळगाव, मरकळ सोळू धानोरे, गोलेगाव परिसरात गेल्या तीन महिन्यांपूर्वी खरीप हंगामातील पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाची काढणी सुरू आहे. यावर्षी खरीप हंगामातील पिकांसाठी पाऊस कमी प्रमाणात झाल्याने सोयाबीन, भुईमुग, इत्यादी पिकांचे उत्पन्न घटले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र आल्याने मोठ्या कंपन्या व गोदामे उभारली असल्याने शेतमजुरांची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आळंदी, चाकण, भोसरी येथील मजूर अड्यावर जाऊन मजूर घेउन येत आहेत व त्यांना एकरी चार हजार रूपये देऊन सोयाबीन पिकाची काढणी करीत असल्याने चित्र पावायास मिळत आहे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)