चिंबळी परिसरात बोअरवेल घेण्याकडे कल

चिंबळी- खेड तालुक्‍यात औद्योगिक क्षेत्रात फेब्रुवारी, मार्च महिन्यापासूनच कडक उन्हाळाच्या झळा जाणवू लागली आहे. तर विहिरीच्या पाण्याची पातळी खोलवर गेली असल्याने पिण्याच्या पण्यासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची कमकरता भासू नये म्हणून, खेड तालुक्‍याच्या दक्षिण भागातील चिंबळी, कुरूळी, केळगाव, मरकळ आदि भागातील शेतकऱ्यांनी 25 ते 30 हजार रूपये खर्च करून शेतात व घराभोवती असलेल्या मोकळ्या जागेत बोअरवेल घेऊन पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी लगबग सुरू केली आहे. एक बोरवेल घेण्यासाठी 70 रूपये फुटप्रमाणे 25 ते 30 हजार रूपये मोजावे लागत असल्याने परिसरातील शेतकरीवर्ग सांगत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)