चिंबळी परिसरात बाजरी, भुईमूग जोमात

टॅंकरच्या पाण्यावर पीके जगविण्याचा यशस्वी प्रयत्न

चिंबळी- खेड तालुक्‍यात औद्योगिक क्षेत्रात असलेल्या चिंबळी परिसरात कुरूळी, मोई, निघोजे, केळगांव, माजगांव, सोळू, धानोरे आदि भागातील शेतकऱ्यांनी एक महिन्यांपूर्वी कांदा व ज्वारी काढणीनंतर शेतीची मशागत करीत पाण्याच्या टॅंकरवर कमीत कमी खर्चात बाजरी व भुईमूग पिकाची पेरणी केली होती.
शेतकऱ्यांनी कष्टातून जगविलेल्या या पीकांवर गेल्या पंधरा दिवसांपासून बदलेल्या वातावरणाचा चांगला परिणाम होत आहे. थंड हवामान बाजरी व भुईमूग पिकाकरिता पोषक ठरत असून गेल्या पंधरा दिवसांपूर्वी इद्रांयणी नदीला पाणी आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या परिसरात पिकाची गेल्या चार-पाच दिवसांपासून खुरपणी सुरू केली आहे. परंतु, परिसरात शेतमजुरांची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत असल्यामुळे शेतकरी स्वत: पिकाची खुरपणी करण्यासाठी लगबग करीत आहेत

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)