चिंबळी- खेड तालुक्‍याच्या दक्षिण भागातील कुरूळी, निघोजे, चिंबळी परिसरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरवण झाले असल्याने या भागात छोट्या-मोठ्या कपंन्यानची गोदामे उभारली गेली आहेत. त्यामुळे या परिसरात मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांची वर्दळ पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाढली असून, मालवाहतूक ट्रकचालक बेकायदेशीरपणे, उलट सुलट विरुद्ध दिशेने वाहने आवडी तिडवी वळवत आहेत, तर काही वाहन चालकाला रस्त्याच्या मध्येच वाहने उभी करून तासन तास महामार्गावरील हॉटेलमध्ये बसतात. चिंबळीफाटा येथे वाहतूक नियंत्रण पोलीस असूनही वाहन चालक बिनधास्तपणे नियमभंग करून वाहने चालवत आहेत, त्यामुळे चिंबळी, कुरूळी येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवासी आणि येथील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. अशा बेकायदेशीरपणे वाहन चालवणाऱ्या चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली ग्रामस्थांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)