चिंबळी परिसरात टोकन पद्धतीने मका पिकाची लागवाड

चिंबळी- या वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने ज्वारीच्या पिकांचे उत्पादन कमी झाले आह, त्यामुळे जनावरांसाठी असलेल्या कडब्याची मागणी वाढली असून सध्या कडब्याचा बाजारभाव साडेतीन हजार रुपये आहे. खेड तालुक्‍यातील ग्रामीण भागातील चिंबळी, कुरूळी, मोई, निघोजे, केळगांव, मरकळ, सोळू, धानोरे आदी भागांतील शेतकऱ्यांनी कांदा, गहू आणि ज्वारीच्या पिकाची काढणी करून शेतामध्ये टोकण पध्दतीने मका पिकाची लागवड केली आहे.

या पिकांपासून जनावरांना हिरवा चारा उपलब्ध होत असून, याबरोबरच मक्‍याची कणसे बाजारात चार ते पाच रुपये किलो दराने विकली जात असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होत आहे, त्यामुळे या परिसरात शेतकऱ्यांनी मका पिकांचे अतंरपीक मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)