चिंबळी परिसरात चारा साठवण्याची लगबग

चिंबळी- यावर्षी पावसाने ओढ दिल्याने खेड तालुक्‍यात चारा आणि पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याने जनावरे कशी जगवायची, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर खेड तालुक्‍यातील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या दक्षिण भागातील कुरुळी, चिंबळी परिसरातील शेतकऱ्यांनी कडबा खरेदी करून, ओळई रचून साठवणूक करण्यासाठी लगबग सुरू केली आहे.

खेड तालुक्‍यात औद्योगिक क्षेत्रात असलेल्या चिंबळी परिसरात इद्रांयणी नदीकाठी जमिनी असल्याने या भागात शेतकरी कांदा, गहू आणि विविध प्रकारची फुलझाडे ही पिके नेहमीच घेत असतात; परंतू यावर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्याने ज्वारीच्या पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात केली. या पिकाला मध्यंतरी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काळपट रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झाला होता, त्यामुळे ज्वारीच्या पिकांचे उत्पन्न कमी झाले आहे. याचबरोबर या भागात कांद्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतल्याने जनावरांना हिरवा चारा नाही. ज्वारीच्या कडब्याची कमतरता जाणवत असल्यामुळे जनावरांना चारा उपलब्ध करून ठेवण्यासाठी वळई रचून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)