चिंबळी परिसरात घनकचऱ्याचे साम्राज्य

 

चिंबळी, दि. 21 (वार्ताहर) – इंद्रायणी नदीच्या काठाव असलेल्या कुरुळी गावाजवळील जुन्या पुलाजवळ विविध कंपन्यांचा नष्ट न होणारा कचरा आणि राडारोडा टाकण्यात आलेल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. हा राडारोडा त्वरीत हटवून स्वच्छता करण्यात यावी, असे चिंबळीच्या सरपंच रेश्‍मा सोनवणे, निघेजेच्या सरपंच सुनीता येळवंडे, मोई गावचे सरपंच एकनाथ कर्पे आणि येथील ग्रामस्थांनी केली आहे. मोई, चिखली हद्दीत इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन फुलाजवळ रात्रीच्या वेळी नदीच्या पात्रालगत पिंपरी चिंचवड मनपाने अनेक वर्षांपासून चिखली ओढ्याचे सांडपाणी आणि ऑईल मिश्रित रासायनिक पाणी थेट इंद्रायणी नदीपात्रात सोडल आहे. हे पाणी त्वरित थांबविण्यात यावे आणि नदीपात्रात लगत टाकण्यात आलेला घनकचरा उचलण्यात यावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)