चिंबळी, निघोजेत विविध कार्यक्रम

चिंबळी- मोई, चिंबळी, कुरुळी, निघोजे, माजगाव (ता. खेड) आदी गावांत महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबाहदुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त फडकेवस्ती (निघोजे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रम घेण्यात आल्याचे मुख्याध्यापक अरुण गायकवाड यांनी सांगितले. महात्मा गांधी यांची 150वी तर लाल बहादुर शास्त्री यांची 114 वी जयंती निमित्ताने प्रथम गावात स्वच्छता प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जीवन कार्याची माहिती मुख्याध्यापक अरुण गायकवाड व विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून दिली. तर स्वच्छ भारत अभियानाच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्ताने चित्रकला व घोषवाक्‍य स्पर्धेचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसांचे वाटप करण्यात आले. तर शाळा परिसर व गावात स्वच्छता करून गावत “स्वच्छ भारत, सुंदर भारत’ हा संकल्प यावेळी करण्यात आला. याप्रसंगी शाळा समितीच्या अध्यक्षा रुपाली फडके, उपाध्यक्ष राजेश येळवंडे, सदस्य नाना फडके, दिलीप फडके, सिताबाई गेंगजे आदी मान्यवर उपस्थितीत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
58 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
16 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)