चिंबळी, कुरुळी परिसर भक्‍तीरसात न्हाला

चिंबळी- पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून कुरुळी, चिंबळी, केळगाव मार्गे, आळंदी येथे जाण्यासाठी निघालेल्या पायी वारी दिंडी सोहळ्यातील वैष्णवांच्या टाळ-मृदंग आणि माउलींच्या जघोषाने आस्मंत दुमदुमला असून परिसरात भक्‍तीमय वातावरण निर्माण झाला आहे. चिंबळी फाटा ते केळगाव-आळंदी रस्त्यावर ठिकठिकाणी नागरिकांकडून या वैष्णवांसाठी चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर विसाव्याच्या ठिकाणी वैष्णांकडून हरिनामासह भजन-किर्तन सुरू असल्याने चिंबळी, कुरुळी, मोई, केळगाव परिसर भक्‍तीरसात न्हाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)