चिंबळी, कुरुळीत प्लॅस्टीकच्या पिशव्यांचे ढीग

चिंबळी- सर्वत्र प्लॅस्टीक बंदी असताना ही खेड तालुक्‍याच्या दक्षिण भागातील चिंबळी, कुरूळी परिसरात असलेले हॉटेल व्यवसायिक व किराणा दुकानदार प्लॅस्टीकच्या पिशव्यांच्या सर्रासपणे वापर करीत आहेत. तर चिंबळी, आळंदी रत्स्यावर व पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याच्याकडेलाच घनकचरा व शिळेअन्न भरून टाकलेल्या प्लॅस्टीक पिशव्यांचे ढीग साचलेले असल्याने हा कचारा रस्त्यावर मोकाट फिरणारी कुत्री पागवंत असल्याने डासांचे प्रमाण वाढले असून दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)