चिंबळी, कुरुळीत औषध फवारणीची मागणी

चिंबळी- गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाची सतत रिमझिम चालू असल्याने चिंबळी, कुरूळी परिसरात मोकळ्या पडीक जागेमध्ये मोठ्या प्रमाणात हिरवेगार गवत उगवले आहे. तर इतर जागेत भाडेकरू घनकचरा व शिळे अन्य प्लॅस्टिक पिशवीमध्ये भरून रत्स्याच्या कडेला टाकत असल्याने दुर्गंधी पसरली असल्याने डासांचे प्रमाण वाढल्यामुळे रोगराई वाढत असल्याने मलेरिया, डेंग्यू, सर्दी, खोकला, ताप, निमोनिया आदी आजारांचे प्रमाण वाढत असल्यामुळे या रोगराईवर आळा घाल्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतिने औषध फवारणी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. कुरूळी, चिंबळी (ता. खेड) येथील गावठाण हद्दीत असलेल्या परिसरातील विविध ठिकाणी मोकळ्या पडीक जागेत व रस्त्याच्या कडेलाच घनकचरा साचत असल्याने विद्यार्थ्यांना ग्रामस्थांना या रस्त्यावरून जाताना व येताना नाक मुठीत धरून जावे लागत आहे. चिलटे नाका-तोंडात व डोळ्यात जातात. त्यामुळे विविध प्रकारचे आजार निर्माण होत असल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने औषध फवारणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)