चिंबळीफाटा रस्त्यावर पायी चालणेही जिकरीचे

चिंबळी- खेड तालुक्‍यात औद्योगिक क्षेत्रात असलेल्या व श्रीक्षेत्र आळंदीकडे जाणाऱ्या चिंबळीफाटा ते चिंबळगाव रस्त्सावर वाहणारे सांडपाण्याची व्यवस्था होत नसल्याने रस्त्सावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत या खड्ड्यात पाणी साचत असल्याने रस्त्स्याची दयनीय अवस्था झाली असल्याने पायी चालणेही जिकरीचे झाले आहे. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून चिंबळीफाटा येथून आळंदीकडे जाणाऱ्या रस्त्सावर असलेल्या जैद पाटील एज्युकेशन संचालित शातांई मेमोरियल स्कूलजवळ असलेल्या रहदारीच्या रस्त्सावर सांडपाणी नेहमी येत आहे. याबाबत आवाज उठवल्याने तात्पुरते हे सांडपणी बंद होते. मात्र, त्यानंतर परिस्थिती जैसे थे होत असल्याने वाहनचालकांचे हाल होत होत आहेत. तर या सांडपाण्यामुळे रस्त्यावर निर्माण झालेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने ते दिसत नसल्याने छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)