चिंबळीत 121 विद्यार्थ्यांना ग्रथालय प्रवेश

चिंबळी- ग्रामीण भागातील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सांप्रदायिक आणि धार्मिक पध्दतीचे वाचन करून त्यांच्या मनात नेहमी वाचनीय ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून भारतीय जनक डॉ. रंगनाथ यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मोई (ता. खेड) माजी सरपंच मुरलीधर दशरथ करपे यांच्या स्मर्णाथ माजी सरपंच पुष्पाजंली कर्पे यांच्या वतीने श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालयामार्फत 121 विद्यार्थाना आणि शिक्षकांना मोफत ग्रंथालय प्रवेश देण्यात आला असून, सर्व विद्यार्थांचे आणि शिक्षकांचे 12 हजार रुपये ग्रंथालय वार्षिक शुल्क माजी सरपंच ग्रंथालयाच्या अध्यक्ष पुष्पांजली कर्पे भरणार असल्याचे विद्यालयाचे संस्थापक, अध्यक्ष तुकाराम गवारे यांनी सांगितले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक नवनाथ तोत्रे, चिंतामणी रोकडे, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष आनंदा गवारे, सामाजिक कार्यकर्ते सुनील कर्पे, खेड केसरी रवींद्र गवारे, वर्गशिक्षक संतोष जोशी, प्रताप गिरी, राजू चौधरी, ज्ञानेश्वर कळसकर, सत्यवान ताजणे, आदी मान्यवरांसह सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ग्रंथालयाच्या अध्यक्ष आणि माजी सरपंच पुष्पांजली कर्पे म्हणाल्या की, मुले ग्रंथालयाकडे येत नसतील तर ग्रंथ मुलांनकडे नेऊ, या भावानेतून सोलापूर जिल्हात या उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमाला जिल्हात चागंला प्रतिसाद मिळाला असल्याने पुणे जिल्हात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)