चिंबळीत साठलेत कचऱ्याचे ढिग

चिंबळी-गेल्या आठवडाभरापासून पावसाने पुन्हा सुरूवात केली असल्यामुळे गावठाण हदीतील मोकळ्या पडीक जागेत हिरवे गार गवत उगवले आहे. तर गावठाण हद्दीतून आळंदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर राजेछत्रपती चौकात खासगी जागेत प्लॅस्टिक पिशव्यांसह घनकचऱ्याचे ढिग साचलेले पाहावयास मिळत आहेत. या रिमझिम पावसामुळे कचरा भिजून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने व डासांची उत्पत्ती वाढल्याने डेंग्यू, मलेरिया, सर्दी, खोकला, इत्यादी आजाराचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे उपचार घेण्यासाठी नागरिकांची खासगी दवाखान्यात धावपळ सुरू असल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे. रोगराईला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावठाण हदीतील विविध ठिकाणी उगवलेल्या गवतावर औषध फवारणी करवी व घनकचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी वारंवार केली जात आहे. या घनकचऱ्यासंदर्भात ग्रामसेवक दिनेश नांगरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले ग्रामपंचायतीच्या वतीने दर शनिवार, रविवार घनकचरा उचलण्यात येतो; पंरतु भाडेकरू हे रोज खासगी जागेत घनकचरा टाकत असल्यामुळे घनकचऱ्याचे ढिग साचतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)