चिंबळीत भीषण पाणीटंचाई

उष्णतेमुळे पाणीसाठा अधिक खालावला

चिंबळी, दि 21 (वार्ताहर) – येथील इंद्रायणी नदी पात्रातील पाणी वातावरणात उष्णता वाढल्याने कमी झाले असून, त्यामुळे नजीकच्या मोई, कुरुळी, चिंबळी, केळगाव, आळंदी, सोळु, धानोरे, मरकळ, गोलेगाव आदी गावांना पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाई जाणवू लागल्याने पुढील चार महिन्यांची अवस्था अधिक बिकट होण्याची शक्‍यता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. चिंबळी गावठाण परिसराला पाणी पुरवठा करण्यासाठी इंद्रायणी नदी पात्रालगत असलेल्या गावकीच्या विहिरीची पाणी पातळी खोलवर गेली असून, त्यामुळे गावाला दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. सदर विहिरीचे खोलीकरण करावे, त्यातील गाळ आणि झाडेझुडपे काढून टाकून, झरे खुले केल्यास विहिरीच्या पाणी पातळीत वाढ होईल, असा अंदाज गावकरी व्यक्त करत आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवत असल्याने चिंबळीतील नागरिकांवर पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आली आहे. या पाणी टंचाईचा मोठा फटका उन्हाळी हंगामातील पिकांना, जनावरांना, मेंढपाळांना बसणार आहे. पात्रातील पाणी आटल्याने मासे देखील मोठ्या प्रमाणात मृत होत आहेत, त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने आजाराचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
गेल्या आठ ते नऊ महिन्यांपूर्वी प्राधीकरणाचे पाणी आणण्यासाठी ग्रामपंचायतीने 48 लाख रुपये भरून पिण्याचे पाणी आणण्यासाठी पाइपलाइनचे काम केले आहे. येत्या एक ते दीड महिन्याच्या कालावधीत नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणार आहे.
– दिनेश नांगरे, ग्रामसेवक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)