चिंबळीत किर्तन सोहळ्यास प्रारंभ

चिंबळी- येथे सालाबादप्रमाणे श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व किर्तन सोहळ्यास हनुमान मंदिरात प्रारंभ झाला असून भाविकांची गर्दी होत आहे. सोमवारी (दि. 27) सकाळी हनुमान मंदिरात वीणा पूजन व विठ्ठल रूख्मिणी मातेच्या मूर्तीची पूजा प्रगतीशिल शेतकरी सिताराम जैद, मुरलीधर जैद, हिरामण गवळी, सदस्य शंकर जैद, यात्रा कमिटीचे अध्यक्ष हिरामण जैद आदि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ज्ञानेश्‍वर कड, कुंडलिक बनकर, अरुण जैद, लक्ष्मण सोनवणे, दादासाहेब जैद, बाजीराव बनकर, पुजारी विलास गुरव, दत्तात्रय भुमकर, भानुदास कड, संदिप बहिरट, पंडित कड, शिवाजी शेलार, सुनिल बटवाल, राजू परदेशी, विजय बहिरट, माणिक जैद, शंकर जैद, संजय जाधव, जय कड, छबू खंडागळे, अशोक पाटोळे, दत्तात्रय कड, हिरामण बहिरट, प्रमोद गुरव, अविनाश दौंडकर आदि मान्यवरांसह उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)