चिंबळी – येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन बुधवारी (दि. 21) सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती खेड बाजार समितीचे संचालक तथा चिंबळीचे माजी सरपंच पांडुरंग बनकर यांनी सांगतिले. चिंबळी येथे बुधावार सायंकाळी पाच वाजता मारूती मंदिर ते बर्गेवस्ती, चिंबळी गाव ते पद्मावती मंदिर रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण, चिंबळी फाटा ते केळगाव-आळंदी रस्त्याच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन मंत्री पाटील यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा प्रमुख राम गावडे, पंचायत समिती सदस्य अमर कांबळे, विभाग प्रमुख अमोल विरकर यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0