चिंबळीतील मंदिर परिसरात वृक्षारोपण

चिंबळी – समाजकार्य व अनाठायी खर्चाला फाटा देत सेवापूर्तीनिमित्त चिंबळी येथील सामाजिक कार्यकर्ते मारूती बनकर यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच पद्मावती मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले तसेच हभप गणेश महाराज वाघ यांचे किर्तन आयोजित करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मारूती बनकर, पद्मावती तरूण मंडळाचे अध्यक्ष समीर बनकर, राहूल बनकर, संतोष सातव, नितीन बनकर, नंदू जाधव, काळूराम बनकर, संभाजी बनकर, ज्ञानेश्‍वर बनकर, शेखर जाधव, ज्ञानेश्‍वर जाधव, अमोल बनकर, लक्ष्मण कातोरे उपस्थित होते. दरम्यान, खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे हभप गणेश महाराज वाघ यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते मारूती बनकर यांचा शाल श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी अनेक मान्यवरांसह व ग्रामस्थ उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)