चिंतामणीच्या दर्शनाबरोबरच पर्यटनाचाही आनंद

थेऊर- पौष महिन्यात आलेल्या संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून थेऊर (ता. हवेली) येथे अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांसमवेत पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.
पहाटे साडेतीनच्या सुमारास श्री चिंतामणीचे वंशपरंपरागत पुजारी सुहास आगलावे यांनी विधिवत महापूजा करून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले. पहाटे थंडी असल्याने भाविकांची गर्दी कमी होती. नंतर मात्र दर्शनासाठी गर्दी झाल्यामुळे वर्दळ वाढली, त्यावेळी दर्शनरांग मुख्य मंदिर आवाराच्या बाहेर गेली होती. दुपारी उन होते तरी हवेत गारवा असल्याने गर्दीचे प्रमाण कमी झाले नाही. त्यामध्ये चंद्रोदयापर्यंत वाढच होत गेली. चिंचवड देवस्थानच्या वतीने सकाळी सात वाजता ट्रस्टचे विश्वस्त हभप आनंदमहाराज तांबे आणि व्यवस्थापक डॉ. मंगलमूर्ती पोफळे यांच्या उपस्थितीत महापुजा करण्यात आली. भाविकांना देवस्थाच्या वतीने उपवासाची खिचडी, तर थेऊर गावांतील तरुणांच्या चिंतामणी तरुण मंडळाच्या वतीने साबुदाणा चिवड्याचे वाटप करण्यात आले. संपूर्ण मंदिर आवार आणि गाभाऱ्यात आकर्षक सजावट करण्यात आली होती. चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि आगलावे बंधूंच्या वतीने दर्शनबारीवर मंडप आणि पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आळंदी देवाची येथील स्वकामसेवा या सेवाभावी संस्थेच्या स्वयंसेवकांनी मंदिर परिसरात स्वच्छता राखण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
भाविकांना दर्शन घेणे सोयीचे व्हावे म्हणून चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त हभप आनंदमहाराज तांबे आणि व्यवस्थापक डॉ. मंगलमूर्ती पोफळे यांनी व्यवस्था पाहिली. यांचबरोबर लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी पोलीस कर्मचारी, होमगार्डसहीत पोलीस मित्र व देवस्थानचे सुरक्षारक्षक असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सायंकाळी हभप कृष्णमहाराज परेराव यांचे कीर्तन झाले. चंद्रोदयानंतर आगलावे बंधूनी श्री चिंतामणीची पालखी (छबिना) काढला यांत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यानंतर ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)