चिंचोली येथे व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात

घोडेगाव – चिंचोली कोकण्यांची (ता. आंबेगाव) येथे तालुकास्तरीय शासकीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आल्या. दोन दिवस झालेल्या या स्पर्धेत तालुक्‍यातून 24 मुलांचे व 14 मुलींचे संघ सहभागी झाले होते. मुलांमध्ये 14 वर्षांखालील संघात भीमाशंकर विद्यामंदिर शिनोली प्रथम क्रमांक, न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी व्दितीय क्रमांक, श्रीराम विद्यालय पिंपळगाव (खडकी) तृतीय क्रमांक 17 वर्षाखालील संघात श्रीराम विद्यालय पिंपळगाव (खडकी) प्रथम क्रमांक, न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी व्दितीय क्रमांक, महात्मा गांधी विद्यालय मंचर तृतीय क्रमांक 19 वर्षाखालील संघात प्रथम क्रमांक संगमेश्‍वर विद्यालय ज्यूनियर कॉलेज पारगांव प्रथम क्रमांक, अण्णसाहेब आवटे कॉलज मंचर व्दितीय क्रमांक, महात्मा गांधी विद्यालय ज्यूनियर कॉलज मंचर तृतीय क्रमांक यांनी विजय मिळविला.
मुलींमध्ये 14 वर्षाखालील संघात न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी प्रथम क्रमांक, भीमाशंकर विद्यामंदिर शिनोली व्दितीय क्रमांक, संगमेश्‍वर विद्यालय पारगाव तृतीय क्रमांक 17 वर्षाखालील संघात न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी प्रथम क्रमांक, भीमाशंकर विद्यामंदिर शिनोली व्दितीय क्रमांक, जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूल चिंचोली कोकण्याची तृतीय क्रमांक 19 वर्षाखालील संघात अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर प्रथम क्रमांक, जनता विद्यामंदिर ज्यनियर कॉलेज घोडेगाव व्दितीय क्रमांक, भीमाशंकर विद्यालय ज्यूनियर कॉलज शिनोली तृतीय क्रमांक यांनी विजय मिळविला.
दरम्यान या स्पर्धेचे उद्‌घाटन पंचायत समिती सभापजी उषा कानडे, तहसीलदार रवींद्र सबनिस, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, पंचायत समिती सदस्या अलका घोडेकर, कपालेश्‍वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रामदास घोलप, सरपंच विलास कोकणे, तंटामुक्‍तीचे अध्यक्ष स्वप्नील कोकणे, शाळा समितीचे अध्यक्ष कि. बा. कोकणे गुरूजी, मुख्याध्यापक व्ही. डी. हगवणे आदी मान्यवरांच्या यांच्या उपस्थितीत झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)