चिंचोलीतील शेतकऱ्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन ः हेलपाटे मारुनही न्याय

घोडेगाव-आंबेगाव तालुक्‍यात खते, बी-बियाणे विक्रेत्यांकडून श ेतकऱ्यांची फसवणूक होत असून शेतकऱ्यांनी आंबेगाव तालुक्‍यातील पंचायत समितीमधील कृषी कार्यालय संबंधित कंपन्या यांच्याकडे तक्रारी करूनही शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे शेतकरी वेगळ्या वाटेने जाणार असल्याचे लेखी निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
आंबेगाव तालुक्‍यातील कृषी बी-बियाणे विक्री करण्याचे दुकानांवर पंचायत समितीचे नियंत्रण असते शेतकऱ्यांना खते बी-बियाणे पुरविण्याचे परवाने देखील पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत दिले जातात. तसेच दुकान वेळोवेळी तपासणीचे अधिकार देखील कृषी विभागाला आहेत. यावर गटविकास अधिकारी यांचे नियंत्रण असते. असे असताना देखील तालुक्‍यातील दुकानदार बोगस कंपन्यांचे बी-बियाणे आपल्या दुकानात विक्रीस ठेवून शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. शेतकरी निकृष्ट बियाणामुळे आपले पीक वाया गेले याची तक्रार कृषी अधिकारी यांच्याकडे करतो. वारंवार हेलपाटे मारूनही शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागत नाही. शेवटी नाईलाजास्तव त्या शेतात पुन्हा मेहनत करून कर्ज काढून दुसरे बियाणे आणून पेरणी करावी लागते.
असाच एक त्रस्त झालेला चिंचोली येथील शेतकरी निवृत्ती झोडगे यांनी मंचर येथील श्रीराम कृषी उद्योग या दुकानातून गाजराचे कलश या कंपनीचे बी खरेदी करून आपले शेतात लावले होते. दोन महिने वाट पाहूनही ते बी उगवून आले नाही. म्हणून झोडगे यांनी पंचायत समिती कृषी कार्यालय बियाण्यांची कंपनी कलश यांचेकडे लेखी तक्रार केली. यावर आम्ही पाहणी करून पंचनामा करतो, अशी उडवाउडवीची उत्तरे मिळाली. एक महिना उलटून गेला तरीही कंपनी व कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही. आता पाऊस पडून गेला असून आजुबाजुच्या सर्व शेतकऱ्यांचे धान्य उगवून आले आहे. झोडगे यांचे शेत मात्र कंपनी व अधिकारी यांची वाट पाहुन पडिक पडले आहे. या शेतकऱ्यांवर आता उपासमारीची पाळी येणार आहे. यामुळे शेतकरी झोडगे यांनी मुख्यमंत्री यांचेकडे निवेदन पाठवुन वेगळा मार्ग अवलंबण्याची परवानगी मागीतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)