चिंचेच्या बागेची स्वच्छता

  • जेजुरी नगरपालिकेकडून तातडीने साफसफाई

जेजुरी, दि. 25 (वार्ताहर) – जेजुरीतील ऐतिहासिक चिंचेच्या बागेतील स्वच्छता व साफ सफाईच्या कामाला पालिका प्रशासनाने तातडीने सुरुवात केली.
नगरपालिका प्रशासनाच्या सुमारे 23 स्वच्छता कर्मचाऱ्यांनी बागेत स्वच्छतेचे काम करीत प्लास्टिक व थर्माकोलच्या पत्रावळ्यांसह अन्य कचरा उचलून घेतला. याबाबत स्वच्छता विभागाचे ठेकेदार विनायक कुडाळकर यांनी सांगितले की, चिंचेच्या बागेत धार्मिक विधी व जेवणावळीसाठी येणारे भाविक आपल्या वाहनातून थर्माकोलच्या पत्रावळ्या व प्लास्टिकचे ग्लास घेऊन येतात, त्यास प्रतिबंध घालणे गरजेचे आहे तसेच वजनाला हलक्‍या व विघटन न होणाऱ्या पत्रावळ्या वाऱ्यामुळे परिसरात विखुरल्या जातात तसेच यामध्ये खरकटे अन्न असल्याने नष्ट करण्याची डोकेदुखी ठरते. गटारे तुंबण्याचे प्रकारही घडतात, त्यामुळे अशा पर्यावरणाला हानिकारक प्लॅस्टिक व थर्माकोल वापरणे टाळावे, असे आवाहन कुडाळकर यांनी केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)