चिंचवड येथे “कलारंग त्रिवेणी संगम’ कार्यक्रम; पु.लं.च्या आठवणींना उजाळा

पिंपरी – पु.ल. देशपांडे यांच्या साहित्यांची त्यांच्या व्यक्‍तीरेखेची ओळख करुन घेण्यासाठी चिंचवड येथे रविवारी (दि.24) “कलारंग त्रिवेणी संगम 2019′ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पु. ल. देशपांडे, गायक सुधीर फडके व लेखक ग.दी. माडगुळकर या तिघांच्या जन्मशताब्दी निमित्त चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

यावेळी पु.ल. देशपांडे यांची भूमिका साकरणारे अभिनेते अतुल परचुरे यांच्याशी गप्पा होणार आहेत. ज्यामध्ये पु.ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. त्यानंतर अभिनेते राहुल सोलापूरकर पु.ल. देशपांडे यांच्या साहित्याचे अभिवाचन करणार आहेत. यावेळी सुमधूर गीतांचा कार्यक्रमही होणार आहे. यावेळी महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर, आमदार लक्ष्मण जगताप, साहित्यिक राजेंद्र घावडे, विनिता ऐनपुरे, डॉ. रजनी शेठ, प्रकाश रोकडे, कलारंग निर्मितीचे अध्यक्ष अमित गोरखे, उपाध्यक्ष शैलेश लेले, नगरसेविका अनुराधा गोरखे आदी उपस्थित राहणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)